अमिताभ बच्चन यांचे मूळ गाव कोणते? KBC मध्ये ‘या’ कारणामुळे मागितली गावकऱ्यांची माफी, म्हणाले…


Amitabh Bachchan KBC Native village : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करत आहेत. शोमध्ये बिग बी त्यांचे वैयक्तिक व सिनेविश्वातील अनुभव शेअर करत असतात. अनेकदा ते स्पर्धकांबरोबर गप्पा मारताना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. नुकतेच त्यांनी केबीसीमध्ये त्यांच्या मूळ गावाचा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी गावकऱ्यांची एका गोष्टीसाठी माफीही मागितली आहे.

‘केबीसी’च्या एका एपिसोडमध्ये स्पर्धक चंद्र प्रकाश तिवारी यांनी ते प्रतापगडचे असल्याचे सांगितले. यावेळी अमिताभ बच्चन हेही त्यांच्या मूळ गावाच्या आठवणीने भावूक झाले. अमिताभ बच्चन यांचे प्रतापगड येथील बाबूपट्टी हे वडिलोपार्जित गाव असून त्यांच्या पूर्वजांचे जन्मस्थान होते. अमिताभ बच्चन यांचे वडील, प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंश राय बच्चन याच गावाचे रहिवासी होते. तेथील आठवणी सांगत बिग बी म्हणाले, “बाबूपट्टी हे आमच्या पूर्वजांचे गाव होते आणि बाबुजी तिथूनच आले होते.”

मी माफी मागतो – अमिताभ बच्चन

पुढे अमिताभ बच्चन म्हणाले, “बाबूपट्टी गावामध्ये आम्हाला एक गोष्ट पूर्ण करायची आहे; पण त्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले आहेत, त्यामुळे तेथील लोक माझ्यावर नाराज आहेत. मला तिथे पुस्तकांचे ग्रंथालय उभारायचे होते पण ते राहिले आहे. जे कोणी बाबपूट्टी येथून बघत आहेत त्यांची मी माफी मागतो; पण ग्रंथालय नक्की उभारेन, काळजी करू नका.”

हेही वाचा
अमिताभ बच्चन

जया बच्चन गेलेल्या बाबूपट्टी गावी

पुढे अमिताभ बच्चन म्हणाले, “माझ्या पत्नी (जया बच्चन) गावी गेल्या होत्या तेव्हा त्यांनी असा विचार केला की, या गावात लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी व वाचण्यासाठी एक चांगली जागा नाहीये, त्यामुळे आपण तिथे अशी लायब्ररी उभारू असा विचार त्यांनी मांडला. त्यावेळी मीसुद्धा होकार दिला. त्यासाठी बिल्डिंग बांधून झाली आहे, पण ती अजूनही रिकामी आहे, पण लवकरच ते काम पूर्ण करू.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *