Pakistan Cricketer Basit Ali At Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar Death) यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीसह क्रीडा क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनाही नानांच्या निधनाने मोठा धक्का बसला. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1994 मध्ये झालेल्या पहिल्या भेटीपासून ते कठीण काळात मिळालेल्या भावनिक आधारापर्यंतच्या आठवणी सांगताना बासित अली भावुक झाले. बासित अली यांनी सांगितले की, नाना पाटेकर हे केवळ उत्तम अभिनेते नव्हते, तर खऱ्या आयुष्यातही तितकेच प्रेमळ आणि दिलदार व्यक्ती होते. पडद्यावर त्यांनी साकारलेली पात्रे आणि त्यांचे वास्तविक व्यक्तिमत्त्व यामध्ये विलक्षण साम्य होते.
1994 मध्ये झाली पहिली भेट
बासित अली म्हणाले, “आज सकाळी मला बातमी मिळाली की माझे प्रिय मित्र नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत. चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांच्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्वासारखीच होत्या.” नाना पाटेकर यांच्यामुळेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफ याला नाना हे टोपणनाव मिळाल्याचेही बासित अली यांनी सांगितले. नाना पाटेकर यांच्यासोबतची त्यांची पहिली भेट 1994 मध्ये झाली होती.
Former Pakistan cricketer Basit Ali’s emotional tribute to Nana Patekar is a beautiful reminder of a friendship that transcended borders. He recalled how the Bollywood legend stayed in touch for decades, checked on his mother during her illness, and reached out after Basit’s own heart surgery. Beyond the screen, Basit remembered Nana as a warm, caring and genuinely good human being. His words also showed just how deeply Nana Patekar was admired in Pakistan. Some artists belong to everyone. Nana Patekar was loved equally on both sides of the border. 🇮🇳❤️🇵🇰
— Brutal Truth (@sarkarstix) October 8, 2026
आई रुग्णालयात असताना नानांचा फोन
नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना बासित अली यांनी त्यांच्या संवेदनशील स्वभावाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यावळी नाना पाटेकर यांच्याशी महिन्यातून एक-दोन वेळा संवाद व्हायचा. बासित अली यांच्या आई रुग्णालयात दाखल असताना नाना दर आठवड्याला त्यांना फोन करायचे. त्यांच्या आईशी बराच वेळ बोलायचे आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून धीर द्यायचे. बासित अली यांना हृदयाशी संबंधित त्रास सुरू झाला होता, तेव्हाही नाना पाटेकर यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांनी संदेश पाठवून तसेच फोन करून बासित अली यांच्या तब्येतीची माहिती घेतली होती. या आठवणी सांगताना बासित अली यांनी नानांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले.
नानांना म्हणायचे ‘तरुण’
बासित अली यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आणखी एका खास आठवणीचाही उल्लेख केला. ते नाना पाटेकर यांना तरुण म्हणायचे, कारण ते आपल्या वयापेक्षा खूपच तरुण दिसत असल्याचे त्यांना वाटायचे. मात्र, यावर नाना पाटेकर गंमतीने उत्तर द्यायचे, “अरे, तरुण राहून काय फायदा? तू म्हातारा आहेस आणि मीसुद्धा म्हातारा आहे.”
हे ही वाचा –















Leave a Reply