मुंबई : वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत आज दुसरा वनडे सामना पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळाल्यानंतर आज मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. दुसरा सामना आज गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यावरही भारतीय संघामध्ये एकमेव बदल होण्याची शक्यता आहे. नेमके कोणते बदल होऊ शकतात, जाणून घ्या.

आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर सिराजची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली तर वेस्टइंडिजच्या फलंदाजांसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु प्रसिद्ध कृष्णाला बाहेर करत सिराजला खेळवण्याची शक्यता आहे. दुसर एक म्हणजे पहिल्या सामन्याक पदार्पण केलेल्या नमन धीरला बाहेर करण्याची चर्चा होती. पण कामगिरीबाबत सांगायचं झालं तर त्याला पहिला सामन्यामध्ये त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. तसेच त्याने गोलंदाजीत पाच षटकांमध्ये ३३ धावा दिल्या. त्यामुळे केवळ एका सामन्यानंतर नमनला संघाबाहेर ठेवणार नाहीत.