Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध ‘कसोटी’ लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव


Sri Lanka vs India, 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका उद्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ नऊ वर्षांनंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यापूर्वी, भारताने 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. 2017 मध्ये भारतीय संघाने 3-0 अशा फरकाने निर्भेळ विजय मिळवला होता. यावेळी शुभमन गिल भारतीय संघाचा कसोटी कर्णधार आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात केवळ तीन खेळाडूंनी श्रीलंकेत कसोटी सामने खेळले आहेत. 12 खेळाडू पहिल्यांदाच श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या यादीत कर्णधार शुभमन गिलचाही समावेश आहे. केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे केवळ तीन खेळाडू आहेत ज्यांना श्रीलंकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे.

केएल राहुलला श्रीलंकेत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. राहुलने श्रीलंकेत पाच कसोटी सामन्यांमध्ये 33.50 च्या सरासरीने 268 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रवींद्र जडेजाने श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याने फलंदाजीने 85 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत 13 बळी घेतले आहेत. दुसरीकडे, कुलदीप यादवने 2017 च्या दौऱ्यात श्रीलंकेतील केवळ एका कसोटी सामन्यात पाच बळी घेतले होते.

तब्बल 9 खेळाडू पहिल्यांदा खेळणार 

शुभमन गिल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार, मानव सुथार, सारांश जैन, आकिब नबी, प्रसिद्ध कृष्णा, सरफराज खान, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जैस्वाल यांसारखे खेळाडू श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामने खेळणार आहेत. भारताने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, पण यावेळी संघाचा चेहरामोहरा लक्षणीयरीत्या बदलला आहे. अशा परिस्थितीत, भारताकडे किती प्रतिभा आहे हा प्रश्न नसून, नवीन पिढी श्रीलंकेतील कठीण परिस्थितीशी किती लवकर जुळवून घेऊ शकते हा प्रश्न आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणारी ही कसोटी मालिका शुभमन गिल आणि टीम इंडियाच्या डब्ल्यूटीसी मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका 2026 चे पूर्ण वेळापत्रक

  • पहिली कसोटी: 15-19 ऑगस्ट 2026
  • स्थळ: गॅले इंटरनॅशनल स्टेडियम, गले
  • वेळ: सकाळी 10:00 (IST)

दुसरी कसोटी: 23-27 ऑगस्ट 2026

  • स्थळ: सिंहली स्पोर्ट्स क्लब (एसएससी), कोलंबो
  • वेळ: सकाळी 10:00 (IST)

भारतीय कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, प्रसिध्द कृष्णा, सरफराज खान, आकिब नबी 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Comment